संत शिरोमणी नरहरी सोनार - Slunečnice.cz Hlavní navigace

 संत शिरोमणी नरहरी सोनार 1.2.1

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo 0 ×
Zdarma

Sdílet

वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेल पत्र वाहत असे. ते शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती. पंढरपुरात राहुन पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच पण मंदिराचा कळसाकडे देखील पहात नव्हते. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती.

नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. ‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई’, ‘शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’, ’माझे प्रेम तुझे पायी’ आणि ‘देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार’ अभंग प्रसिद्ध आहेत. नरहरी सोनार म्हणतात, देवा मी तुझा सोनार आहे आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केली आहे आणि त्यात ब्रह्मरस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत, ती शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे. त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस, ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे.

यादवकालात शिवांचे (शंकराचे) उपासक ‘शैव’ आणि विष्णूचे (विठ्ठलाचे) उपासक ‘वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे समताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानदेवांनी शिव आणि विष्णू ही एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी ‘हरिहरैक्यां’ची समन्वयवादी भूमिका घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख केला जातो. ज्ञानदेवांनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे पूर्ण केली. ते प्रारंभी नाथ संप्रदायिक (शिवोपासक) होते. ‘कटिसूत्र’ प्रसंगानंतर ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील अभेद जाणवला.

नरहरी महाराजांच्या या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न. धन्यवाद.
~ टीम संत नरहरी महाराज

Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste

Staženo
0 ×

TIP: Stahují se vám programy pomalu? Změřte si rychlost svého internetového připojení.